व्हीआरडीईच काय कोणताही प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जावू देणार नाही : खा.डॉ.श्रीकांत शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे.

अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी नगरच्या व्हीआरडीई संदर्भात माहिती घेऊन स्थलांतराबाबत आपण केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करुन हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करु.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगून  खा.संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार संरक्षण मंत्र्याची भेट घेऊन याबाबत चर्चा करु, असे आश्­वासन दिले.

हा प्रश्न नगरचा नसून, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही.  या संदर्भात लवकरच दिल्ली येथे सर्वपातळ्यांवर प्रयत्न करणार असल्याचे खा.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.