अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या संकटावर मात करण्यात देशाने चांगले काम केले असून अशावेळी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि निर्णयामुळे आपण देशाला नक्की वाचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
येथील जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातुन काल तालुक्यातील मुंगी, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, आव्हाणे, अमरापुर येथील गरजूना जीवनावश्यक साहित्याचे वाटप त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंग पाळून मदत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.खा. डॉ. विखे म्हणाले, अडचणींच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना धीर देणे हा विखे घराण्याचा वारसा आहे.
मतदारसंघातील प्रत्येक गावात अन्नधान्य व किराणा मदत पोहचवली जात आहे. तालुका व जिल्हा प्रशासन चांगले काम करते आहे.
यावेळी बांधकाम समितीचे सभापती सागर फडके, अमोल सागडे, शिवाजी समिंदर, राजेंद्र ढमढेरे, सुरेश नेमाणे, संदीप पातकळ, सत्यनारायण मुंदडा, चंद्रकांत गरड, अनंता उकिर्डे, बापुसाहेब पाटेकर, नंदू आहेर, बाळासाहेब कळमकर, विजय पोटफोडे, सदा कळमकर हे प्रमुख उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®