Weather : यावर्षी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त ऊन जाणवले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Departmen) लोकांना याबाबत सावध राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मार्च महिन्यात उन्हामध्ये जास्त बाहेर पडू नका, उन्हाची तीव्रता अधिक आहे, असे संदेशही (Message) देण्यात आले आहेत.
मार्च २०२२ हा महिना १९०१ पासून देशातील सर्वात उष्ण ठरला आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. IMD कडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी मार्चच्या तापमानाने मार्च २०१० मध्ये नोंदवलेल्या कमाल तापमानाची सार्वकालिक सरासरीही ओलांडली आहे.
१२ वर्षातील सर्वोच्च कमाल सरासरी उष्णता
आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी (RK Jenamani) यांनी सांगितले की, मार्च २०१० मध्ये सरासरी कमाल तापमान ३३.०९ अंश सेल्सिअस होते. त्याच वेळी, मार्च २०२२ मध्ये, सरासरी तापमान ३३.१ अंश सेल्सिअस होते. यासह उन्हाळ्याचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत निघाले.
यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून सतत उष्णतेची लाट आहे
वायव्य भारतासाठी, मार्च महिना २०२० मध्ये सर्वात उष्ण ठरला. दुसरीकडे, मार्च २०२० हा महिना मध्य भारतासाठी दुसरा सर्वात उष्ण होता. या दोन्ही भागात यंदाच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची लाट कायम आहे.
पावसाअभावी हिल स्टेशन्सही गरम होतात
IMD नुसार, या वर्षी मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशातील अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे. तेथे पाऊस अत्यल्प झाला आहे. दिल्ली आणि हरियाणासह उत्तर भारतातील हिल स्टेशन्समध्येही दिवसभरातील तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.