लॉकडाऊन सत्कारणी! घरी बसलेली मुले शिकली घरगुती व्यवसाय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  देशभर कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला होता. कडक नियमांमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते.

दिवसभर घरातच बसून अनेकांनी आपला परंपरागत व्यवसाय शिकला. तसेच वडिलोपार्जित सुरु असलेला उद्योग व्यसाय हा या रिकाम्या वेळेत आत्मसात केला.

यामुळे खर्या अर्थाने लॉकडाऊन सत्कारणी लागला आहे, असे म्हणता येईल. कोरोनाच्या महामारीमुळे शाळा- महाविद्यालय बंद आहेत. अनेकजण कामगार वर्क फ्रॉम होम करीत आहेत.

लॉकडाऊन शिथिल झाले असले तरीही लोकांचे जनजीवन अद्यापही सुरळीत झाले नाही. शाळा-कॉलेज बंद आहेत. विविध व्यवसाय सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत.

सरकारी तसेच खासगी कार्यालयातही कमी अधिक प्रमाणातच नियमानुसार उपस्थिती आहे. काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

त्यामुळे अनेक जण अद्यापही घरीच आहेत. त्याच परिणाम बहुतेक जणांना घरी भरपूर वेळ मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी आपले घरगुती पारंपरिक वडिलोपार्जीत व्यवसायात लक्ष घातले आहे.

तसेच, शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत. त्यांनाही वडिलोपार्जीत व्यवसायात गोडी वाटू लागली आहे. त्यांच्यावर हळूहळू वयोमान व कुवतीनुसार जबाबदारी टाकत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment