खासदार सुजय विखे पाटील नव्या सरकार बाबत म्हणतात ….

Published on -

अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि भाजपाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्‍यात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्‍या लोकाभिमुख निर्णयावर जनतेने शिक्‍कामोर्तब केले होते.

आता पुन्‍हा एकदा राज्‍याला विकासाच्‍या संधी मिळतील अशी प्रतिक्रीया खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

मुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्‍यमंत्री ना.अजित पवार यांच्‍या शपथ विधीनंतर प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की,

राज्‍यातील राजकारणाच्‍या भुकंपाचे धक्‍के मला सकाळीच बसले मुख्‍यमंत्र्यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थापन होणारे सरकार हे आता स्थिर असेल.

मागील ५ वर्षांच्‍या कार्यकाळात त्‍यांनी घेतलेल्‍या निर्णयांमुळे विधानसभा निवडणूकीत जनतेने पुन्‍हा एकदा भाजपाला कौल दिला होता.

आता पुन्‍ही एकदा त्‍यांच्‍याच नेतृत्‍वाखाली सरकार स्‍थापन होत असल्‍यामुळे राज्‍याला विकासाच्‍या संधी निर्माण होतील. शेतक-यांच्‍या प्रश्‍नांबाबत प्राधान्‍याने निर्णय होतील अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe