अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउनदरम्यान एक तरुण-तरुणी प्रेमात पडले..त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांचं लग्नही झालं.
मात्र यानंतर ऑक्टोबर महिन्यात या दोघांमधील वाद इतका वाढला की पतीने पत्नीची हत्या केली. यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात गेला व त्याने आपला गुन्हा कबूल केला.
इंदूर शहरातील एका कुटुंबातील वादातून नवविवाहित दाम्पत्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मिळालेल्या माहितीनुसार पतीने कुत्र्याच्या साखळीने पत्नीची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला.
परंतू जेव्हा त्याला जमलं नाही, त्यानंतर त्याने सुऱ्याने अवघ्या 22 वर्षीय पत्नीची हत्या केली. यानंतर आरोपी पतीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला.
कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी लग्न केलं होत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved