अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण आज (रविवार) होणार आहे. सकाळी १० वाजून १७ मिनिटांपासून ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. मध्य दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी असेल, तर मोक्षकाळ दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी होईल.
ज्योतिष आणि विज्ञानाच्या गणनेनुसार, यावेळी होणाऱ्या ग्रहणामध्ये सूर्याचे ९८ टक्के बिंब चंद्राकडून झाकले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, हे ग्रहण काही प्रमाणात शुभ फळ देणारे आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/06/सूर्यग्रहणा.jpg)
मृगशीर्ष, आर्द्रा नक्षत्र आणि मिथुन राशीच्या लोकांना हे ग्रहण लागेल. ग्रहणादरम्यान, गुरु, शनी, मंगळ, शुक्र, राहू आणि केतू वक्री अवस्थेत असतील. हे ग्रहण अंशत: किंवा पूर्णत:ही नसेल.
जाणून घेऊयात ग्रहणाचा राशींवर काय परिणाम होणार याविषयी :
मेष – लाभ प्राप्ती
वृषभ – कार्यक्षेत्रात अडथळे
मिथुन – कष्टदायक
कर्क – कौटुंबिक चिंता
सिंह – लाभ प्राप्ती
कन्या – आनंदकारक
तुला – मानसिक चिंता
वृश्चिक – कष्टदायक
धनु – आरोग्यचिंता
मकर – सौख्यकारक
कुंभ – आरोग्यपीडा
मीन – शारीरिक कष्ट
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews