अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- एक प्रेमवेडा तरुण उस्मानाबाद येथून चक्क पाकिस्तानात असलेल्या प्रेयसीला भेटायला निघाला होता. परंतु या वेड्या आशिकाला भारत-पाक सीमेवरुन सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
झिशान सिद्दिकी असे या तरुणाचे नाव असून उस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते पण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले आहे कारण त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
क्वारंटाइन केल्यामुळे पुढील 14 दिवस या पठ्ठ्याचा मुक्काम हा कच्छमध्येच असणार आहे. त्याचे झाले असे, उस्मानाबाद येथील झिशान नावाचा प्रेमवेडा तरुण इंजिनिअरींगचा विद्यार्थी आहे.
या प्रेमवेड्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील एका तरुणीशी जुळलेल्या प्रेमाला खरे करण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानला जाण्याचे ठरवले.
उस्मानाबादहून तो अहमदनगरपर्यंत चक्क सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरातमधील आंतराष्ट्रीय सीमेपर्यत दुचाकीनं प्रवास केला.
मात्र, सीमेच्या जवळील वाळूत त्याची दुचाकी अडकल्यामुळे तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. मात्र, सुरक्षा जवानांनी सीमेवर वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडली.
नंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली असता पाकिस्तान आणि कच्छ सीमेवर फिरत असलेल्या झिशान याला ताब्यात घेतलं. झिशान याला बीएसएफच्या जवानांनी गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या तरुणाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याने कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कलम 3 (1)(6)नुसार तसंच कलम 188नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाइन केल्यामुळे पुढील 14 दिवस या पठ्ठ्याचा मुक्काम हा कच्छमध्येच असणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा