माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  तुला पक्षाने आमदारकी दिली आहे, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही’, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला.

पूजा चव्हाण प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन टीका केली होती.

त्यावर वाघ म्हणाल्या, ‘अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. नवीन आमदार झालाय, चांगले काम कर. बाकी माझे आणि माझ्या बापाचे(शरद पवार) काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’, असे वाघ म्हणाल्या.

‘वाघाची’ डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळी सुद्धा हवेत कशी विरून जाते हे ही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते,’ अशी टीका मिटकरी यांनी ट्विटरवरुन केली होती.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe