अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल काहीही वावगे बोललात, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते खा. नारायण राणे यांनी गुरुवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.
छत्रपतींच्या कुळाबद्दल विचारणारे संजय राऊत आहेत तरी कोण? मुख्यमंत्रीपदाच्या स्वार्थासाठी तडजोड करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊच नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी संजय राऊत यांचे वक्तव्य महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.
सध्या सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीचे अस्तित्वच कुठे जाणवत नाही. दीड महिना उलटूनही जनहिताच्या दृष्टीने एकही निर्णय झाला नाही.
शासन निर्णय काढला, तरीही त्यावर तारीख नसल्यामुळे तो कायदेशीर होत नाही. आठवडी बाजाराप्रमाणे मंत्री एक दिवस मंत्रालयात येतात आणि संध्याकाळी परत जातात, असे ते म्हणाले.