अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता क्लिनचिट मिळवुन सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतरही वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत राज्यातील जनतेला समजलेच नाही अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यात लॉकडाऊनचा कालावधी जाहीर असतानाही वाधवान बंधुना लोणावळा ते महाबळेश्वर असा पास गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना दिला होता यावरुन राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.
राज्य सरकारही टिकेचे धनी ठरले. जनतेचा रोष लक्षात घेता अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मात्र आता पुन्हा सरकारनेच त्यांना क्लिनचिट देवून सेवेत हजर करुन घेतल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आ.विखे पाटील म्हणाले की,
प्रशासनातील एक उच्च पदस्थ आधिकारी आशा पध्दतीने पास देण्याचे धाडस कोणाचा आशिर्वाद असल्याशिवाय करु शकणार नाही ही बाब त्यांनी प्रामुख्याने माध्यमांच्या निदर्शनास आणून दिली. अ
मिताभ गुप्ता यांनी स्वत:च्या आधिकारात वाधवान बंधुना दिलेल्या पत्राची बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणाची ताबडतोब सिबीआय चौकशी करा ही मागणी आपण केली होती.
वाधवान बंधुचा बागबान कोण? या संपुर्ण प्रकरणामागील बोलविता धनी कोण? हे राज्याला समजले पाहीजे ही आपली भूमिका होती. पण राज्य सरकारने सिबीआय चौकशीची घोषणा करुन राज्यातील जनतेची दिशाभूल केली हेच आता उघड झाले आहे.
अमिताभ गुप्ता यांना मात्र आता सरकारने दिलेली क्लिनचिट बड्या नेत्याच्या आदेशावरुनच मिळाली असेल असा टोला त्यांनी लगावला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com