अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिवसेंदिवस विवावबाह्य संबधातून होणारे गुन्हे वाढतच चालले आहेत,शुल्लक कारणातून तर कधी आर्थिक गरज व कधी शारीरिक संबधासाठी सात जन्म सोबत रहाण्याचे वाचन घेतलेले जोडपे व्याभीचाराच्या वाटेवर जातात आणि अनर्थ घडतो.
दरम्यान अशीच एक घटना मुंबईतील बोरिवली पूर्व येथून समोर आली आहे,माहेरी जाण्यासाठी निघालेली पत्नी माहेरी न जाता पोहोचली प्रियकराच्या घरी सापडली आहे.
याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि या पतीची पत्नी माहेरी जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. यानंतर काही वेळाने पतीने पत्नीच्या मोबाइलवर कॉल करुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, बराचवेळ झाला तरी पत्नी नवऱ्याचा फोन उचलत नव्हती. त्यानंतर या पतीने तिच्या माहेरी संपर्क केला पण आपली मुलगी घरी आलीच नाही असा प्रतिसाद या व्यक्तीला मिळाला.
अखेर घाबरलेल्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबईतून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनीही तातडीने तपास यंत्रणा कामाला लावत बेपत्ता महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलिसांनी महिलेच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन ट्रेस केलं आपल्या पत्नीचं शेवटचं मोबाइल लोकेशन कांदिवलीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पतीने स्वत: घटनास्थळावर जात पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यानंतर या पतीला पत्नी भेटली खरी मात्र ती एका व्यक्तीसोबत एका घरात आढळून आली. ज्या व्यक्तीच्या घरात आपली पत्नी भेटली ती व्यक्ती म्हणजे तिचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली आहे.
आपली पत्नी माहेरी जात असल्याचं सांगून प्रियकरासोबत आढल्याने संतप्त झालेल्या पतीने आपल्या मित्रांना बोलावलं. यानंतर संतप्त पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला मारहाण केली.