अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून कोरोना पॉझिटीव्ह्सचे आकडे कमी होत नसून याच दरम्यान एक महत्वाची सुखद बातमी समोर आलीय.
जर एखादा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह झाला असेल तर विमा कंपनी त्याला पैसे देण्याची एक योजना समोर येतेय.असे वृत्त Zee न्यूजच्या वेबसाईटवर प्रसिध्द झाले आहे,
या वृत्तात सांगितले आहे कि,इंश्योरंस रेग्युलेटर IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना कोरोनाशी संबंधित फिक्स बेनिफिट कोविड योजना आणण्याच्या सूचना केल्या आहेत.
३० जूनपर्यंत सर्व योजना सुरु होवू शकतात यामुळे कोणीही कोरोना पॉझिटीव्ह असल्यास त्याला ठराविक रक्कम वीमा कंपन्यांना द्यावी लागणार आहे.
यासाठी वीमा प्रिमियम ठरवण्याचा निर्णय कंपन्यां घेणार आहेत विमा ग्राहकांना ५० हजारांपासून ५ कोटींपर्यंत सम इश्योर्ड प्रोडक्ट मिळू शकतो. कोरोना संक्रमण पाहता १५ दिवसांचा अवधी कंपन्यांना देण्यात आलायं.
दरम्यान कोरोनाचं संकट पाहता सध्याच्या वीमा पॉलिसीवरील आरोग्य वीम्याचा प्रिमियम २० टक्क्यांनी वाढवण्यात आलाय. टर्म इंश्योरन्समध्येही कंपनियांनी प्रिमियम राशी वाढवली आहे.
प्रत्येक वर्षात १० हजार वीमा करणाऱ्या व्यक्तींपैकी ३ जणांचा मृत्यू होतो असे प्रमाण असते पण गेल्या महिन्यात ही सरासरी बदलली आहे. अचानक वाढलेल्या या मृत्यूदरामुळे वीमा कंपन्यांना मोठा झटका बसला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews