अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आ.रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकासाठी वळवलेला निधी या मुख्य विषयाला बगल देत त्यांनी शहरातील पाच चौकात साडे अडोतीस लाख रुपये काढले असल्याचा जो आरोप केला आहे, तो पूर्णत: खोटा असून कोणीतरी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे केला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी करत त्याच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीकडून ही अपेक्षा नाही,
जर तुमच्या कडे पुरावे असतील तर त्यांनी ते ग्राम दैवत संत श्री गोदड महाराज मंदिरात घेऊन यावेत मी माझे पुरावे घेऊन येतो तेथेच सोक्षमोक्ष करू असे थेट आव्हानच आ रोहित पवार यांना पत्रकार परिषद घेऊन दिले, तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपांना आमचे नगरसेवकच उत्तर देतील असेही यावेळी राऊत यांनी सांगितले.
कर्जत शहरातील विकास कामे व स्मारकावरील निधीच्या माध्यमातून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पुन्हा टीका करत महापुरुषांच्या स्मारका साठी निधी वळविण्यासाठी कर्जत नगरपंचायत साठी खास आदेश काढल्याच्या विषयाला बगल दिली असल्याचा आरोप केला आहे,
आमदार रोहित पवार यांनी मुस्लिम समाजाच्या रक्तदान कार्यक्रमास उपस्थित असताना कर्जत शहरातील स्मारकाचा निधी वळविला व महापुरुषांचा अवमान केल्याच्या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना कर्जत शहरातील पाच चौकावर साडे 38 लाख रुपये काढले गेले असल्याचा त्या त्या चौकाचे फोटो दाखवून आरोप केला होता.
यावरच नामदेव राऊत यांनी बोट ठेवत या पाचही चौकात झालेल्या कामाचे व त्यावर खर्च झालेल्या पैशाबाबतचे कागदपत्रे पत्रकारांना देत सविस्तर माहिती देऊन या पाच चौका पैकी अण्णाभाऊ साठे चौक व भांडेवाडी येथील स्वागत स्तंभ यासाठी एक रुपयाही काढलेला नाही, तर उर्वरित बाजारतळ येथील जैन स्मारक, म्हसोबा गेट येथील चौक कामे व कापरे वाडी येथील एकता चौक या कामांंचे अवघे 13 लाख पंधरा हजार 396 रुपये अदा केले गेले आहेत, बाजारतळ येथील जैन स्मारकासह परिसरातील पेविंग ब्लॉक चा त्यामध्ये समावेश असून म्हसोबा गेट येथील चौकाला जोडणाऱ्या रस्त्याच्या ब्लॉकचा यामध्ये समावेश आहे.
कापरेवाडी येथे हिंदू-मुस्लीम त्याच्या दृष्टीने एका साईडला जगदंबा मंदिर एका साईडला मारुती मंदिर व एका बाजूला मस्जिद आहे त्या मुळे येथे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून एकता चौक उभारला जाणार असून तिथं शासकीय जागा आहे त्यावर अतिक्रमण असून त्याबाबत बोलणे सुरू आहे जागा उपलब्ध होताच येथे एकता चौकाचे स्मारक उभारले जाणार असून येथेही चौकाला जोडणार्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉकचा या कामामध्ये समावेश आहे व जेवढे काम पूर्ण झाले आहे तेवढाच निधी अदा करण्यात आला आहे.
नगर पंचायत साठी मंजूर होणारा निधी हा जिल्हाधिकारी यांच्याकडे असतो नगरपंचायतने त्याबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर जिल्हाधिकारी पैसे अदा करतात त्यामुळे पैसा काढून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी माहिती राऊत यांनी देतानाच आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचे कडे पहात आहे त्यांनी खरी माहिती न घेता दुसऱ्याच्या व चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीचे आरोप करू नयेत.
भ्रष्टाचार न करता भ्रष्टाचाराचे आरोप करणे हा बदनाम करण्याचा डाव असून आगामी काळात इतर विषयांवर मी वेळोवेळी बोलणारच असल्याचा निर्वाळाही राऊत यांनी देताना कर्जत नगर पंचायती मधील महापुरुषांच्या स्मारकांचे पैसे दिनांक 24 जून रोजी वळविण्याचा आदेश मंत्रालयातून निघाला त्याच दिवशी कर्जत नगरपंचायतीच्या चौकशीचा ही आदेश काढण्यात आला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली.
आ. रोहित पवार यांनी त्यांच्याकडे साडे 38 लाख रुपये या पाच चौकाच्या कामात काढल्याचा पुरावा असेल तर तो घेऊन ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांच्या मंदिरात यावे मी पण माझ्याकडील कागदपत्रे घेऊन येतो तेथे ते जनतेसमोर व पत्रकारांसमोर सोक्षमोक्ष करू असे थेट आव्हान राऊत यांनी दिले असून कोणतेही कागदपत्र न देता बोलणारे आमदार रोहित पवार हे आव्हान स्वीकारतील काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews