पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता लागेल का मार्गी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार पाळतील का शब्द?

ज्यात सत्तेत आलेले हे महायुतीचे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील का?याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. याबाबत जर आपण गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा असा पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत बघितले तर हा प्रकल्प 16000 कोटी रुपयांचा असून कित्येक दिवसापासून रखडलेला आहे.

Pune-Nashik High-Speed Railway:- नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या व राज्यामध्ये प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन झाले व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी शपथ देखील घेतली.

आता या सरकारच्या माध्यमातून कामकाज सुरू करण्यात आलेले असून राज्यातील जनतेच्या या सरकारकडून अनेक अशा अपेक्षा आहेत. राज्यात सत्तेत आलेले हे महायुतीचे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील का?याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

याबाबत जर आपण गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा असा पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत बघितले तर हा प्रकल्प 16000 कोटी रुपयांचा असून कित्येक दिवसापासून रखडलेला आहे.

परंतु आता राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महत्वाचा असलेला हा 16000 कोटी रुपयांचा रखडलेला प्रकल्प आता तरी मार्गी लागेल का? याकरिता आवश्यक निधी आता तरी उपलब्ध करून देण्यात येईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

तसेच या प्रकल्पाबाबत मात्र शेतकरी गोंधळात असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकल्प पुणे ते नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान प्रवासासाठी खूप महत्त्वाचा असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक हा प्रवास दीड तासात पूर्ण होणे शक्य होणार आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची आशा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे व नासिक प्रवास अवघ्या दीड तासात पूर्ण करता येईल याकरिता उपयुक्त असलेला हा 232 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या अवस्थेमध्ये आहे.

परंतु आता राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर व मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले असून त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला आता तरी न्याय मिळेल का? व याकरता आवश्यक असलेल्या निधीची तरतूद होईल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

हा रेल्वे मार्ग पुणे तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने या तीनही जिल्ह्यातील औद्योगिकरण तसेच कृषी व उद्योग, इतर व्यवसायांना नव संजीवनी मिळण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे.

त्याकरिता हा प्रकल्प लवकर मार्गी लावावा अशी मागणी उद्योजक तसेच शेतकरी, व्यापारी, कामगार व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हा मार्ग पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक असा प्रस्तावित करण्यात आला आहे.

परंतु आता या मार्गामध्ये काही बदल होईल अशी देखील सध्या चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. या रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात आता बदल होईल अशी शक्यता असून हा मार्ग पुणे, शिर्डी, सिन्नर व नासिक असा असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रेल्वे मार्गाचा फायदा अहिल्यानगर तसेच पुणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यांना होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पथदर्शी प्रकल्पाला गती देणार असल्याचे अनेकदा सांगितले आहे व त्यामुळे आता ते त्यांचा शब्द पाळतील का याकडे लक्ष लागून राहिले आहे. इतकेच नाही तर पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या जमिनीचा मोबदला देखील देण्यात आला असून हा प्रकल्प आता मार्गे लागेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

या प्रकल्पाबाबत संबंधित अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका देखील झाले आहेत. या प्रकल्पासाठी कोणत्या जमिनींचे संपादन केले जाणार आहे व या जमिनींचे नकाशे देखील आले होते. परंतु हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe