रणजीतसिंह डिसले यांच्या सारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांना मिळाला या बद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत.

श्री. डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते आज युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजीतसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढ़े म्हणाले, डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे.

यावरच ते थांबले नसुन त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. श्री. डिसले यांची शिक्षाण क्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. कोवीड नंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.

मुंबई महानगर पालिकेतील शाळांमधून वर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी डिसले यांच्यासारखे तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपुर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही त्यांनी यावेळी सूचविले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment