अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महिलेला तिच्या ड्रायव्हरवर प्रेम झालं. इतकेच नाही तर महिलेने तिच्या मुलांसमोरच ड्रायव्हरसोबत संबंध ठेवले. जेव्हा महिलेने पाहिले की तिची मुले तिच्याकडे पहात आहेत, तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्याकडे पाहू नका. आपले काम करा’
याबाबत सविस्तर माहिती अशी कि महिलेच्या नवऱ्याने तिच्यापासून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावण्यासाठी महिलेने कोर्टाला अपील केले, पण आता कोर्टाने महिलेचे अपील फेटाळले आहे.
मुलांच्या वडिलांनी महिलेपासून घटस्फोटाची मागणी केली आहे. मुलांनाही वडिलांसह राहायचे आहे कारण आईकडे राहिले तर त्यांचं काहीही भविष्य राहणार नाही.
घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान, किशोरवयीन मुले (मुलगा आणि मुलगी) यांनी महिला आणि ड्रायव्हर यांच्यामध्ये कोर्टात अनैतिक संबंध असल्याचा पुरावा ठेवला. हे संपूर्ण प्रकरण बंगळूरुमध्ये घडलं आहे.
हा पुरावा पाहिल्यानंतर न्यायमूर्ती पी.बी.बजंत्री आणि नटराज रंगस्वामी यांनी सांगितले की, ही महिला खूप निर्दयी आहे. यामुळे, एक आनंदी कुटुंब नष्ट झाले आहे.
हे प्रकरण 2013पासून कोर्टात सुरू आहे. पण जेव्हा मुलांनी महिलेला ड्रायव्हरला किस करताना पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी या सगळ्याचा पुरावा कोर्टासमोर ठेवला आणि कोर्टाने वडिलांच्या बाजूने निर्णय दिला.
मुलांनी कोर्टाला सांगितले की, त्यांची आई आधी त्यांना आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेली. त्याच्या सोबत तिचा प्रियकर ड्रायव्हरही होता. मग आईने मुलांना सांगितले की, ‘तुम्ही दोघे 10-15 फूट अंतरावर बसा. आणि नंतर त्यांनी सेक्स केला.