अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रुग्ण संख्या वाढतच चालली असून मृत्यू दरातही वाढ होत आहे. त्यामुळे आता एक वेगळीच चिंता उभी राहिली आहे.
मृतांची संख्या वाढत असल्याने शवागृहे भरत चालले असून केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने रुग्णालय प्रशासनाला मृतदेह कॉरिडॉरमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. रुग्णांमध्ये भीती वाढत चालली आहे.
केईएम रुग्णालयाच्या शवागृहात २७ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. तर रुग्णालयात सध्या एकूण ३७ मृतदेह आहेत. त्यामुळे १० मृतदेह कॉरिडॉरमध्ये ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
इतर रुग्णालयांतही अशीच परिस्थिती आहे. मृतदेह ठेवण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कॉरिडॉरचा फोटो सोमवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी असणारी यंत्रणा, नातेवाइकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास लागणारा वेळ यामुळे शवागृहांच्या यंत्रणेवरही ताण येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
सरकारी रूग्णालयात कोरोनाबाधित मृतदेहांची समस्या सोडविण्यासाठी आता विशेष कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, केवळ मृतदेहांच्या व्यवस्थेसाठी चतुर्थ श्रेणी कामगारांची भरतीही करण्यात आली आहे.
त्यानुसार आता अर्ध्या तासात संबंधित रूग्णालयातील मृतदेह बंदिस्त करून अर्ध्या तासात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे शक्य होणार आहे. अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com