अशोक चव्हाणांनी रुग्णालयातून केल्या ‘या’ मागण्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण सध्या मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षाच्या स्पिकअप इंडिया या अभियानात सहभाग नोंदवला.

यासाठी अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच एक व्हिडिओ फेसबूकवर शेयर केला आहे. व त्यातून काही मागण्या त्यांनी केल्या आहेत. केंद्र सरकारने गरीब कुटुंबांच्या बॅंक खात्यात एकरकमी १० हजार रूपये जमा करावेत.

तसेच कॉंग्रेस पक्षाने सुचवलेल्या ‘न्याय’ योजनेनुसार पुढील सहा महिने त्यांच्या खात्यात दरमहा ७ हजार ५०० रूपये जमा करावेत, अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे.

वेगवेगळ्या राज्यांमधून मजूर त्यांच्या मूळ राज्यात जात आहेत. त्यांच्या प्रवासाचा आणि खाण्यापिण्याचा सर्व खर्च सरकारच्या स्तरावर झाला पाहिजे.

ते गावात गेल्यानंतर त्यांना वर्षातून २०० दिवस रोजगार मिळावा, यादृष्टीने नियोजन केले पाहिजे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजमध्ये उद्योगांना कर्ज देण्याची घोषणा केली आहे,

पण ही वेळ उद्योगांना कर्ज देण्याची नाही, तर थेट आर्थिक मदत देण्याची आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. तसंच कर्जांचे हफ्ते आरबीआयने पुढे ढकलले असले,

तरी सरकारने बँकांशी चर्चा करावी आणि विशिष्ट कालावधीचं व्याज माफ करावं, अशी मागणीही अशोक चव्हाणांनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment