होय लवकरच बससेवा सुरू होणार आहे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  राज्यात आता लॉकडाऊनमध्ये हळूहळू आता शिथिलता देण्यात येत असून लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होईल. पुढील आठवडय़ात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

कोरोनाच्या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी राज्यात प्रवासी वाहतूक बंद करण्याबरोबर आंतरजिल्हा बससेवा बंद करण्यात आली होती. पण आता मिशन बिगिन अंतर्गत जिल्ह्यामध्ये बससेवा सुरु केली आहे.

सध्या एसटीसेवा सुरु असली तरीदेखीस जिल्हांतर्गतच सेवा सुरु असून प्रवाशांची संख्याही मर्यादीत ठेवण्यात आली आहे. राज्य सरकार एसटीसेवा सुरू करण्यासाठी अनुकूल असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी याबबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe