Romantic Tourist Place: तुमच्या जोडीदाराला सोबत न्या व पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रातील ‘या’ रोमँटिक पर्यटन स्थळांना भेट द्या! आहेत बेस्ट ऑप्शन

Ajay Patil
Published:
tourist place in maharshtra

Romantic Tourist Place:- महाराष्ट्रामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत की ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये भेट दिल्यानंतर जीवनातील सर्वच ताण तणाव तसेच कामाची दगदग यापासून काही कालावधी करिता आपल्याला मुक्तता मिळवता येते व एक शांत आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेता येतो. पावसाळ्यामध्ये बरेच जण कुटुंबासोबत किंवा मित्रांसमवेत एखादी ट्रीप प्लान करतात

किंवा आपल्या जोडीदारासोबत एखाद्या रोमँटिक पर्यटन स्थळाला भेट देण्याची प्लॅनिंग करतात व आपल्या जोडीदारासोबत काही क्षण निवांत आणि रोमँटिक मूडमध्ये घालवता येईल असा काहींचा प्लॅनिंग असतो. तुमचा देखील असाच काही प्लॅन असेल तर महाराष्ट्रातील काही ठिकाणे हे या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या पावसाळ्यात या ठिकाणी भेट देऊ शकतात.

 जोडीदारासोबत पावसाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील ही स्थळे आहेत उत्तम

1- लोणावळा खंडाळा लोणावळा आणि खंडाळा ही पर्यटन स्थळे पावसाळ्यातील ट्रिप साठी खूप उत्तम अशी ठिकाणे असून या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला अनेक रिसॉर्ट आणि व्हिला उपलब्ध आहेत व या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक टाईम व्यतीत करू शकतात.

2- माथेरान माथेरान हे ठिकाण मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळचे ठिकाण असून तुम्हाला जर कमी वेळेमध्ये ट्रिप प्लॅन करायचे असेल तर माथेरान हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही हंगामामध्ये माथेरानला भेट देऊन पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करू शकतात. माथेरानचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खुलून दिसते.

3- अलिबाग अलिबाग हा देखील रोमँटिक पर्यटनासाठी एक उत्तम असा पर्याय असून कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये ट्रीप प्लान करायचे असेल तर तुमच्यासाठी अलिबाग हा एक उत्तम आणि चांगला पर्याय आहे.

4- मालवण मालवण हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे खूप सुंदर असे ठिकाण असून या ठिकाणचा सुंदर समुद्रकिनारा आणि त्या किनाऱ्यावर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अगदी मनमोकळ आणि निवांत वेळ घालवू शकतात. असल्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर फिरणे मनाला खूपच सुंदर अनुभव देऊन जाते.

5- रत्नागिरी रत्नागिरी हा देखील एक उत्तम ऑप्शन असून त्या ठिकाणचा शांत आणि अथांग पसरलेला समुद्रकिनारा हा पर्यटनासाठी खूप उत्तम ठिकाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेले गणपतीपुळे तसेच दापोली, हरिहरेश्वर यासारखे अनेक प्रसिद्ध टुरिस्ट पॉईंट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

6- महाबळेश्वर महाबळेश्वर हे देखील ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण असून प्रसिद्ध हिल स्टेशन आहे व महाबळेश्वरला कपल कडून खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. पावसाळ्यामध्ये  या ठिकाणी पसरलेली हिरवाई आणि वाहणारे नदी नाले यामुळे या ठिकाणच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe