अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू’, असे सूचक वक्तव्य यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन पार पडले.
या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते होते. यावेळी विदर्भाच्या मुद्यावरून देखील मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच म्हणाले होते की, आमच्यामध्ये विदर्भाचं रक्त आहे. त्यांच्यावर किमान हे म्हणण्याची तरी वेळ आली याचं आम्हाला समाधान आहे.
पण विदर्भाचं नुसतं रक्त असून चालणार नाही कारण अनेक नेत्यांनी विदर्भाशी बेईमानी केली तशी बेईमानी तुम्ही करु नका.’, असा टोला फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved