अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : नाशीक जिल्ह्यातील इगतपुरी लग्नात अडथळा नको म्हणून मुलीच्या प्रियकराचाच आईने नातलगांच्या मदतीने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून घोटी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तालुक्यातील तळेगाव शिवारातील कातोरेवाडी येथील एका युवकाचा ओंडली शिवारात मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पंडित ढवळू खडके असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
संशयितांना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी घोटी पोलिस ठाणे हद्दीतील ओंडली शिवारात एका २० वर्षीय युवकाचा पाय व प्रेताचा सांगाडा कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यामुळे या युवकाचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांना आला. दरम्यान मुलीच्या आईने खुनाची कबुली दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews