लॉकडाऊन, संचारबंदी आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही अल्पवयीन मुलगी बेपत्ता !

Published on -

पुणे :- शहर लॉकडाऊन, संचारबंदीही लागू आणि रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही धायरी परिसरातून एक १६ वर्षांच्या मुलगी बेपत्ता झाली आहे.

मागील बारा दिवसांपासून मुलगी बेपत्ता असून अद्याप पोलिसांना तिचा शोध घेण्यात यश आलेले नाही. धायरी परिसरातील ३६ वर्षीय महिलेने गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या कुटुंबीयांसमवेत धायरी परिसरात राहायला आहेत. ४ एप्रिलला त्यांची १६ वर्षीय मुलगी सोसायटीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन येते, असे सांगून सकाळी ८ वाजता खाली गेली.

त्यानंतर ती परतली नाही. तिचे कुटुंबीय व नातेवाइकांनी मागील आठ ते दहा दिवस तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. ही मुलगी इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe