बायको सोडून गेल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर शहरात काल संजयनगर भागात अनोळखी मृतदेह आढळून आला. नाशिक येथील नावावरुन पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कसून चौकशी केली.

त्यानंतर सदर तरुण हा श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती वार्ड नं . ७ येथील असून त्याचे नाव प्रदीप उर्फ पल्या सुरेश सातपुते , वय ३६ असे असून त्याचा एक भाऊ नाशिक येथे असतो .

नातेवाईकांकडून प्रदीप सातपुते यांच्या संबंधी पोलिसांनी चौकशी केली असता २ वर्षापासून त्याची बायको त्याला सोडून गेली आहे . त्यातून वैतागून त्याने आत्महत्या केली असावी , असे नातेवाईकांनी सांगितल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment