अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जळगाव : वडिलांच्या गोळ्या घेण्यासाठी जळगावला येत असतांना वाटेत डोक्याला रुमाल बांधण्यासाठी उभ्या असलेल्या २२ वर्षीय तरुणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याची घटना दि. १६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत तरुण गंभीर जखमी होत रुग्णालयात पोहचण्याआधीच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील स्कोडा कार चालक हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महेश दिलीप म्हाळके (वय २२, रा. विरवाडा, ता. चोपडा) हा चोपडा येथील महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत असून वडिल शेती काम करतात.