तरुणांनी नोकरीऐवजी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळावे – माजी आमदार शिवाजी कर्डिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. आपल्या देशामध्ये ७० टक्के ग्रामीण भाग आहे. यामुळे सुशिक्षीत तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करावा.

शेतीला पुरक बी-बियाणे,दूध व्यवसाय व पालेभाज्यांचा व्यवसाय करावा. तरुण पिढीने शेती व्यवसायाचे ज्ञान अवगत होण्यासाठी शेती व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.

मार्केटयार्ड येथे आयोजित कार्यकमात कर्डिले बोलत होते. यावेळी आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, नरेंद्र बाफना, संजय घुले, माजी सभापती अशेाक झरेकर, राजेंद्र चोपडा, हरिभाऊ कर्डिले, संदीप कर्डिले, विकास शिंदे, रेवणनाथ चोभे, शांतीलाल गांधी, बलभीम शेळके,

अभय लुंकड, अमोल तोडमल, किरण भंडारी, गणेश औटी, सुनील ठोकळ, शेखर वैद्य, विशाल पवार, रमेश गायकवाड, रमेश इनामकर, संचालक महेश इनामकर, गणेश इनामकर, आप्पासाहेब कर्डिले, जगन्नाथ मगर, हभप अजय महाराज बारस्कर उपस्थित होते.

यावेळी महेश इनामकर यांनी प्रास्तासविकात शेती व्यवसायाविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप अजय महाराज बारस्कर यांनी तर आभार गणेश इनामकर यांनी मानले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment