विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याप्रकरणी तरुणाला अटक

Ahmednagarlive24
Published:

जळगाव : शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी तपासचक्रे फिरवून पोलिसांनी रात्री ऋषीकेश सोनवणे (१८) रा. वाल्मिकनगर याला ताब्यात घेतले.

रविवारी त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलीचा पाठलाग करून तरूण शाळेच्या गेटजवळ थांबत असायचा.

छेडछाडीच्या जाचाला कंटाळून मुलीने आई वडिलांच्या कानावर प्रकार टाकला. त्यानंतर पालकांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता तरूणाने धमकाविले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment