राहुरी ;- तालुक्यात ईदच्या दिवशी गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फारूक मन्सूर इनामदार (वय २०, आंबी) असे या युवकाचे नाव असून आंबी शिवारातील प्रवरा नदीपात्रात झाडाला दोर बांधून त्याने गळफास घेतला.

दुपारी नातेवाईकांनी पाहिल्यावर आरडाओरडा करून इतरांना बोलावून घेतले. मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. फारूखच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली.
दरम्यान नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत फारुख याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे, त्याची आजी व मोठा भाऊ समवेत तो राहत होता,
मोलमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करीत होता.फारूक याला पबजी गेम खेळण्याचा नाद होता. दिवसभरातील आठ-आठ तास तो हा खेळ मोबाइलवर खेळत असे.
रमजान ईदच्या आनंदच्या दिवशी ही घटना घडल्याने संपूर्ण आंबी गावावर शोककळा पसरली आहे.
मोबाईलमध्ये असलेल्या पबजी गेमच्या व्यसनामुळे अनेक तरुण आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.
- ड्रोन, हायपरसोनिक क्षेपणास्त्रं, AI रणगाडे…; भारताचा फ्यूचर डिफेन्स प्लॅन उघड!5 सुपर वेपन्स जे शत्रूला हादरवतील
- एका तुटलेल्या गाडीपासून बनली होती पहिली ‘रोल्स रॉयस’, वाचा जगातील सगळ्यात लक्झरी कारचा थक्क करणारा इतिहास!
- ‘या’ नवख्या कलाकाराने सलमान-अजयलाही मागे टाकलं! 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहाच!
- नेटवर्क फुल असतानाही कॉल अचानक डिस्कनेक्ट होतोय?, मग ‘ही’ सेटिंग लगेच चेंज करा!
- एखादा सामान्य व्यक्ती झोपण्यात किती वर्षे घालवतो?, आकडे ऐकून तुमची झोपच उडेल!