मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकमध्ये मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटमधला आरोपी युसूफ मेमन (वय-54) याचा मृत्यू झाला आहे.ह्रदयविकाराच्या तीव् झटक्याने त्याने नाशिकच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्येच शेवटचा श्वास घेतला

नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृहात सकाळी युसूफ मेमन याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं.

मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युसूफ मेमन हा 1993 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता.

१२ मार्च १९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. यात २५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जखमी झाले होते. साखळी बॉम्बस्फोटांमुळे एकूण २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.

युसुफला नाशिकमध्ये तुरुंगात टाकले होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि, आजारपणामुळे तो काही काळ तुरूंगच्या बाहेरही होता.

मानसिक विकाराचा बळी असलेल्या युसूफलाही तुरूंगात डांबण्यात आले. त्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर झाला, परंतु या कालावधीत ते उपचारासाठी रुग्णालयातच राहतील या अटीवर.

या प्रकरणात याकूबची मेव्हणी आणि सुलेमान मेमन यांची पत्नी रुबीना मेमन यांनाही दोषी ठरविण्यात आले होते. स्फोटांच्या वेळी रुबीनाच्या नावे असलेल्या मारुती कारमधून शस्त्रे आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment