अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत.
नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत.

शहरातील करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषदेनेही उपाययोजना सुरू केल्या असून 30 सप्टेंबरपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचारी उपस्थितीबाबतचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर बुधवारी यांनी काढला आहेत.
प्रभारी सीईंओ भारे यांच्या आदेशात गट-अ आणि गट-ब अधिकार्यांना शंभर टक्के उपस्थिती राहणे बंधनकारक आहे. प्रत्येक विभाग प्रमुखाने त्यांच्या नियंत्रणाखालील कर्मचार्यांना दररोज कार्यालयात न बोलवता 50 टक्के उपस्थिती याप्रमाणे आळीपाळीने कार्यालयात बोलवावे.
याशिवाय अधिकारी-कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेबाबतची सवलत देण्यासंदर्भातही निर्णय विभाग प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, हे करताना दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
कार्यालयीन महत्त्वाच्या व तातडीच्या शासकीय कामांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने आवश्यकता वाटल्यास संबंधित विभागप्रमुख कर्मचार्यास कार्यालयीन उपस्थित राहण्याबाबत आदेश देतील.
तसे असल्यास त्या कर्मचार्याला कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. याशिवाय कोरोनासंदर्भात शासनाच्या ज्या काही नियम व अटी आहेत त्या पाळणे बंधनकारक राहील, असेही या आदेशात म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved