Fixed Deposit : 400 दिवसांतच व्हा मालामाल, ‘या’ बँका एफडीवर देत आहेत बंपर व्याज !

Ahmednagarlive24 office
Published:

Fixed Deposit : तुम्ही सध्या सुरक्षित आणि उत्तम परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. जिथे जेष्ठ नागरिकांना सार्वधिक फायदा होत आहे. येथे पैशांच्या सुक्षेसह हमी परतावा देखील मिळतो. येथे गुंतवणूक करून तुम्ही फक्त 400 दिवसांतच मालामाल होऊ शकता. कोणती आहे ही योजना? चला जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला एफडीमधील गुंतवणुकीबद्दल सांगत आहोत. आज आम्ही अशा 4 बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8 टक्के व्याज देत आहेत. FD वर ८ टक्के परतावा मिळणे खूपच आकर्षक आहे. आज आम्ही अशाच चार बँकांबद्दल सांगणार घेणार आहोत, ज्या एफडीवर आपल्या गुंतवणूकदारांना ८ टक्केत्यांपेक्षा जास्त व्याज ऑफर करत आहेत.

पहिली बँक पंजाब आणि सिंध बँक

येथे सामान्य लोकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ७.४० टक्के परतावा मिळत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज देते. ही ऑफर 31 जानेवारी 2024 पर्यंतच घेता येईल.

CSB बँक

हे ज्येष्ठ नागरिकांना आचार्य मुदत ठेव नावाची विशेष एफडी ऑफर करत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ४०१ दिवसांच्या एफडीवर ७.७५ टक्के व्याज मिळू शकते. बँकेने 1 डिसेंबर रोजी व्याजदरात सुधारणा केली आहे.

इंडसइंड बँक

1 डिसेंबर रोजी या बँकेने एफडी दर देखील सुधारित केले. ही बँक ८ आणि ८.२५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 8.25 टक्के व्याज आणि 2 वर्षांपेक्षा जास्त ते 61 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8 टक्के व्याज उपलब्ध आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक

ही बँक 400 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 8.10 टक्के व्याज देत आहे. याशिवाय 12 महिन्यांच्या एफडीवर 8 टक्के व्याज, 600 आणि 900 दिवसांच्या एफडीवर 7.90 टक्के व्याज दिले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe