आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण खरेदीखत किंवा हक्क सोडपत्र तसेच बँकांच्या कर्ज प्रकरणांमध्ये प्रतिज्ञा पत्रासह इतर गोष्टींकरिता आपल्याला स्टॅम्प पेपर लागत असतो व अगोदर या सगळ्या कामांसाठी आपल्याला अवघे 100 ते 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती.
परंतु आता बँक तसेच विविध कामांसाठी केले जाणारे प्रतिज्ञापत्र, खरेदीखत तसेच हक्क सोडपत्र इत्यादीसाठी शंभर ते दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती.
परंतु आता या कामांसाठी चक्क पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. त्यामुळे आता या निर्णयाने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दन्ड सहन करावा लागणार आहे.
शंभर रुपयांचा स्टॅम्पवरील दस्त आता होणार पाचशे रुपयांना
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अवघ्या शंभर किंवा दोनशे रुपयात केला जाणाऱ्या वैयक्तिक कारणांचा बँकेसह विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखता नंतरचे खरेदीखत, हक्क सोड पत्राकरिता पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क आता मोजावे लागणार आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह विविध प्रकारच्या अनेक योजनांवर कोट्यावधी रुपयांची खैरात सुरू असल्यामुळे अन्य योजनांकरिता निधी कमी पडू लागल्याचे सध्या बोलले जात आहे. एवढे महसुली उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता मुद्रांक शुल्कात वाढ केल्याचे देखील चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
सरकारी कार्यालयातील मुद्रांक शुल्क
प्रतिज्ञापत्र तसेच हक्क सोडपत्र, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर अगोदर केले जात होते. परंतु आता या सगळ्या गोष्टी करण्याकरिता आता शंभर किंवा दोनशे रुपयांच्या मुद्रांक शुल्क ऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे.
परंतु सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय अगोदर झालेला असल्याने त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचे देखील माहिती या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.