7th Pay Commission:- नुकतीच काही दिवसां अगोदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने चार टक्क्यांची वाढ केली असून त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना 42 टक्क्यांवरून या चार टक्के वाढीसह 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असून या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या उद्देशाने काही महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकार घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जर आपण काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यानुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी 2024 पासून सहा महिन्यांकरिता चार टक्क्यांची महागाई भत्त्यात वाढ केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंबंधीची महत्त्वपूर्ण घोषणा मार्च 2024 मध्ये होईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
महागाई भत्ता हा एआयसीपीआय निर्देशांकावरून ठरवला जातो. जर सध्याचा हा निर्देशांक पाहिला तर तो 139.1 टक्क्यांवर पोहोचला असल्याने वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता असून त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जर चार टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचेल. आधी 46 टक्के इतका महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळत आहे व तो साधारणपणे एक जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांना लागू आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी एक जानेवारी ते 01 जुलै या कालावधीत महागाई भत्त्यामध्ये सुधारणा केली जाते. परंतु हा निर्णय साधारणपणे मार्च ते सप्टेंबरच्या सुमारास जाहीर केला जातो.
कशी केली जाते महागाई भत्त्याची गणना?
केंद्र सरकारच्या माध्यमातून सन 2006 मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी असलेल्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत यांच्या गणनेच्या फार्मूला मध्ये बदल केला गेला होता.
आता जून 2022 मध्ये संपलेल्या कालावधी करिता अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या म्हणजेच एआयसीपी या निर्देशांकाच्या बारा महिन्यांच्या सरासरीतील टक्केवारी वाढीच्या आधारे महागाई भत्त्याची गणना करण्यात येते.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये किती होणार वाढ?
सरकारच्या माध्यमातून जर चार टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला तर त्याचा थेट फायदा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत होणार आहे.
उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या कर्मचाऱ्याचा प्रतिमहिना पगार जर पन्नास हजार रुपये असेल व त्याचे मूळ वेतन पंधरा हजार रुपये असेल तर त्यांना 6300 सध्या मिळत आहेत व ते मुळवेतनाच्या 42 टक्के इतके आहे. मात्र जर आता ही चार टक्क्यांची वाढ झाली तर कर्मचाऱ्याला 6 हजार 900 रुपये मिळतील म्हणजेच 600 रुपये पगारात अधिक मिळतील.