Tips For Become Rich: तुमची देखील श्रीमंत होण्याची इच्छा आहे का? तर फॉलो करा ‘या’ टिप्स! व्हाल श्रीमंत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tips For Become Rich:- प्रत्येक जण काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करत असतो व या माध्यमातून जो काही आपण पैसा कमावतो या पैशांची बचत करून किंवा त्या पैशातून आपण श्रीमंत होण्याच्या दिशेने प्रयत्न करत असतो. परंतु बऱ्याचदा होते असे की जीवनामध्ये जगत असताना बरेचदा आपले आर्थिक नियोजन चुकते व काही केले तरी आपल्या पैशांची बचत होऊ शकत नाही

व त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आर्थिक शिस्त असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा तुम्ही कमावलेला पैशाचे नियोजन कसे करतात याला खूप महत्त्व आहे.

त्यामुळे तुमच्या दररोजच्या आयुष्यातील जर काही गोष्टी नियंत्रित पद्धतीने किंवा शिस्तीने केल्या तर  तुम्ही श्रीमंतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. या अनुषंगाने आपण काही महत्त्वाच्या गोष्टी या लेखात बघणार आहोत.

 श्रीमंत होण्याचा मूलमंत्र

1- तुमचे उत्पन्न तीन भागांमध्ये विभागा समजा तुम्ही सध्या जे काही कमावत आहात ते उत्पन्न कमी असेल तरीदेखील तुम्ही ते उत्पन्न तीन भागांमध्ये विभागणी गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही काही महत्त्वाचे खर्च वगळून काही पैसे तुमच्या मनोरंजनाकरिता बाजूला ठेवू शकतात व त्यातील काही पैसे गुंतवणुकीसाठी ठेवणे गरजेचे आहे.

यामध्ये जर काही अनावश्यक खर्च असतील तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा पूर्णपणे थांबवण्याकरिता तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्ही अशा पद्धतीच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण केले नाही तर तुम्हाला पैसे बचत करणे शक्य होणार नाही व त्यामुळे ते तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवू शकणार नाहीत.

त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक आणि बचत करायची असेल तर आर्थिक शिस्त सर्वात महत्त्वाची ठरेल. तुमचे उत्पन्न कितीही असो परंतु ते खर्च करताना शिस्त असणे खूप गरजेचे आहे.

तुम्ही जे काही कमावता त्यामधून 50% रक्कम कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी वापरणे गरजेचे असून काही महत्त्वाच्या प्रलंबित कामांकरिता तुम्ही 20% रक्कम वापरू शकतात तेव्हा गरजेनुसार खर्च करू शकतात व उरलेले पैसे कुठेतरी गुंतवणूक करणे गरजेचे असते. अशामुळे तुमचा खर्च देखील पूर्ण होईल आणि तुम्ही पैसे देखील गुंतवू शकाल.

2- अशा पद्धतीने गुंतवणूक करावी तुमच्या बचतीमधून तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर ती तुम्ही अनेक पोर्टफोलिओमध्ये करणे गरजेचे आहे. तुम्हाला मोठ्या रक्कमेची मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर ती वेगवेगळ्या एफडी खात्यांमध्ये करणे गरजेचे आहे.

आर्थिक गरजेवेळी तुम्ही एखादी एफडी तोडली तर तुम्हाला उरलेल्या एफडीवर व्याज मिळत राहते. समजा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. परंतु यामध्ये तुम्ही गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.

तसेच तुम्ही सोन्यामध्ये किंवा सरकारी योजनांमध्ये थोडा थोडा पैसा गुंतवू शकतात व यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळू शकतो. महत्वाचे म्हणजे सोने व सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवल्यामुळे बाजारातील जी काही जोखीम असते ती कमी होते.