7th Pay Commission update : बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३% वाढ केली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता (DA) जाहीर केला आहे. हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिन समारंभात ही घोषणा करण्यात आली.

वाढीव रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. डीएमध्ये वाढ झाल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर म्हणाले, ‘राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2.25 लाख कर्मचाऱ्यांना 6000 कोटी रुपयांचा लाभ मिळावा यासाठी अलीकडेच नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहेत. परंतु काही संवर्गातील नवीन वेतनश्रेणीमध्ये काही विषमता असल्याचे जाणवले.
कर्मचाऱ्यांना आधीच दिलेल्या दोन पर्यायांव्यतिरिक्त तिसरा पर्याय दिला जाईल. मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांसाठी २.२५ आणि २.५९ च्या पटांव्यतिरिक्त तिसरा पर्याय जाहीर केला आहे. तिसरा पर्याय 15% ची थेट वाढ असेल. शासनाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली आहे.
महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ
जय राम ठाकूर यांनी घोषणा केली की, राज्य सरकारच्या पेन्शनधारकांनाही पंजाब सरकारच्या नवीन वेतनश्रेणीनुसार पेन्शन दिली जाईल. यासह 1.75 लाख पेन्शनधारकांना सुमारे 2000 कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना तीन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता (डीए वाढ) देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांनाही ३१ टक्के डीए मिळणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.