7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. कारण केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते.
यामध्ये महागाई भत्ता (DA) आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. वाढत्या किमतीची भरपाई करण्यासाठी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलेला डीए वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित केला जातो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर, सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
डीए वाढ
डीएमधील शेवटची सुधारणा मार्चमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. हे नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. 4 टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता या वेळीही सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास डीए 46 टक्के होईल.
फिटमेंट फॅक्टर
सामान्य फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 टक्के आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्याला 4200 ग्रेड पे मध्ये 15,500 रुपये मूळ वेतन मिळते, तर त्याचे एकूण वेतन 15,500×2.57 रुपये किंवा 39,835 रुपये असेल.
6व्या CPC ने 1.86 च्या फिटमेंट रेशोची शिफारस केली आहे. फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या वाढीमुळे किमान वेतन सध्याच्या 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होणार आहे.
डीए वाढीची गणना कशी केली जाते?
केंद्र सरकार एका सूत्राच्या आधारे कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि डीआरमध्ये सुधारणा करते. हे त्याचे सूत्र आहे.
महागाई भत्ता टक्केवारी = ((गेल्या 12 महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक सरासरी (AICPI सरासरी) (आधारभूत वर्ष 2001=100) -115.76)/115.76)x100
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता टक्केवारी = (गेल्या 3 महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक क्रमांकांची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100) -126.33)/126.33)x100 अशा प्रकारे गणना केली जाते.