बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! या बँकेत निघाली मोठी भरती, आजच ‘या’ इमेलवर पाठवा आपला अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking Jobs Maharashtra : नोकरीच्या शोधात असलेल्या विशेषता ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.

मात्र अनेकांनी कॉमर्स फॅकल्टी मधून शिक्षण घेतलेले नसल्याने त्यांना बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध होत नाही. मात्र, आता बारावी पास असलेल्या तरुणांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

बंधन बँकेने बारावी पास तरुणांसाठी भरतीची घोषणा केली आहे. त्यासाठी बँकेच्या माध्यमातून अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार बँकेत फील्ड वर्कर या पदासाठी भरती होणार आहे. यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आव्हान केले जात आहे.

मात्र इच्छुक उमेदवारांना यासाठी बँकेच्या अधिकृत ईमेल आयडीवर आपला अर्ज पाठवायचा आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्याच्या ‘या’ विभागात निघाली 512 रिक्त पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

कोणत्या पदासाठी होणार भरती?

बंधन बँकेने जारी केलेल्या जाहिरातीनुसार बँकेमध्ये फील्ड वर्कर या पदाची भरती होणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

जारी झालेल्या अधिसूचनेनुसार फील्ड वर्कर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी 21 ते 32 वर्ष वयोगटातील उमेदवार ऑनलाईन पद्धतीने बँकेने उपलब्ध करून दिलेल्या ईमेल आयडीवर आपला अर्ज सादर करू शकतात.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय ! महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळणार मुद्रांक शुल्कात मोठी सूट, ‘त्या’ जाचक अटीही झाल्यात रद्द

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँकेने उपलब्ध करून दिलेल्या ई-मेल आयडी वर आपला अर्ज सादर करायचा आहे. territoryhr.mumbai@bandhanbank.com या अधिकृत ईमेल आयडी पर इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

या पदासाठी काल अर्थातच 31 मे 2023 पासून अर्ज स्वीकारण्यासं बँकेकडून सुरुवात झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक बँकेने उपलब्ध करून दिलेली नाही.

अडचण असल्यास या नंबर वर करा संपर्क

7045339374/9563612685 या बँकेने उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर इच्छुक उमेदवार या भरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती जाणू शकणार आहेत. 

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! पुण्याहून सुरु होणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, सांगली ते पुणे प्रवास होणार जलद, कसा राहणार रूट, वेळापत्रक, वाचा….