नगर शहरात विखे पाटलांच्या प्रचाराचा झंझावात ! दिवसभर मतदारां समवेत संवाद साधून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या निर्णयांची माहीती

Ahmednagarlive24
Published:

नगर शहरामध्‍ये विविध समाज घटकांच्‍या भेटी घेवून मंत्री विखे पाटील यांनी महायुतीला समर्थन देण्‍याचे आवाहन केले आहे. आज दिवसभरात विविध क्षेत्रातील मतदारां समवेत संवाद साधून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या निर्णयांची माहीती दिली.

शहरातील दाळ मंडई येथे मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत व्‍यापा-यांची बैठक संपन्‍न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली दहा वर्षात घेतलेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयांची माहीती त्‍यांनी या बैठकीत दिली. आज उद्योग आणि व्‍यापारी क्षेत्र प्रगतीपथावर जात आहे. याला केंद्र सरकारचे सकारात्‍मक निर्णय उपयुक्‍त ठरत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रेमराज सारडा महाविद्यालयात मंत्री विखे पाटील यांनी संस्‍था चालक तसेच प्राध्‍यापकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाला ३२ वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण मिळाले. ज्‍यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वांच्‍याच जबाबदा-या वाढल्‍या आहेत. कौशल्‍य शिक्षणाला प्राधान्‍य देत शिक्षण क्षेत्राची वाटचाल यापुढे आपल्‍या सर्वांना पुढे घेवून जावे लागेल.

जिल्‍ह्यामध्‍ये आता औद्योगिक आणि तिर्थक्षेत्र विकासाला प्राधान्‍य देवून आपले काम सुरु झाले आहे. यामाध्‍यमातून रोजगार निर्मिती हेच उदिष्‍ठ असून, जिल्‍ह्याच्‍या विकास आराखड्यासाठी सर्वांच्‍याच सुचना अभि‍प्रेत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शहरातील विविध व्‍यापारी प्रतिष्‍ठाण सेवाभावी संस्‍था, सामाजिक संघटनांचे प्रमुख आदिंच्‍या भेटी घेवून मंत्री विखे पाटील यांनी महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना पाठबळ देण्‍याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी जिल्‍हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर अध्‍यक्ष अभय अगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, विनायक देशमुख आदि पदाधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थि‍त होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe