7th Pay Commission: नवीन वर्षात का केली जाऊ शकते 5 टक्के महागाई भत्ता वाढीची अपेक्षा? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
dearness hike update

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांअगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यानुसार अगोदर कर्मचाऱ्यांना जो काही 42% इतका महागाई भत्ता मिळत होता तो आता या चार टक्के वाढीसह 46 टक्के इतका झालेला आहे.

तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये घरभाडे भत्ता देखील वाढवला जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण जर देशाच्या राजकीय स्थितीचा मागोवा घेतला तर असे दिसून येते नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये  तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपाने पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनल मध्येच भाजपाने यश मिळवले असे म्हटले जात आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देखील भाजपाला घवघवीत यश मिळेल अशी एक शक्यता निर्माण झाल्याने येणाऱ्या दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या देखील काही अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीकरिता पाच टक्के महागाई भत्ता वाढ केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असं झाले तर महागाई भत्ता हा 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडेल व त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्ता देखील वाढण्याची शक्यता आहे.

 या कारणामुळे महागाई भत्त्यात येणाऱ्या वर्षात होऊ शकते पाच टक्क्यांची वाढ

आपल्याला माहित आहेच की महागाई भत्ता हा एसआयसीपीआय निर्देशांकाच्या ठरवला जातो. जर आपण याची ऑक्टोबर महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहिली तर हा निर्देशांक 138.4 अंकांवर आहे. महिनाभरापूर्वीच्या तुलनेमध्ये या निर्देशांकामध्ये 0.9 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची आकडेवारी यायची बाकी असली तरी देखील आत्तापर्यंतचा पॅटर्न जर बघितला तर त्यानुसार जानेवारी ते जून 2024 या कालावधीमध्ये जी काही महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाईल ही आतापर्यंतचे सर्वात मोठी वाढ ठरू शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महागाई भत्त्याचा जो काही स्कोर असतो तो एआयसीपीआय निर्देशांका द्वारे निश्चित केला जातो. महागाई किती आहे आणि त्या तुलनेमध्ये कर्मचाऱ्यांचा भत्ता किती वाढवण्याची गरज आहे

याच्याशी निगडित आकडेवारी ही दाखवण्यात आलेली आहे. जर महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली तर त्याचा फायदा देशातील 50 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि 64 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe