7th Pay Commission: मार्च महिना ठरेल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा! तब्बल वाढणार इतका पगार,वाचा माहिती

Published on -

7th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी चार टक्क्यांची वाढ करण्यात आली व त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 46 वरून 50% झाला आहे. त्यासोबतच निवृत्तीवेतनधारकांना मिळणारी महागाई सवलत म्हणजेच डीआर देखील चार टक्क्यांनी वाढून 50% पर्यंत करण्यात आलेला आहे.

वाढवण्यात आलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत प्रामुख्याने एक जानेवारी 2024 पासून प्रभावी मानली जाणार आहे व याचा फायदा संपूर्ण देशातील 49.18 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख केंद्र सरकारचे पेन्शनधारक यांना होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही पगार आणि पेन्शन धारकांना जी काही पेन्शन मिळते त्याचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून महागाई भत्त्याला ओळखले जाते.

त्यामुळे साहजिकच यामध्ये महागाई भत्तात झालेली वाढीचा परिणाम हा पगार वाढीवर दिसून येतो. सध्या मार्च महिना सुरू असून या महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असल्याने लवकरच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील व या मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीची महागाई भत्ता थकबाकी, मार्चचा वाढलेला महागाई भत्ता आणि वाढलेला घर भाडेभत्ता म्हणजेच एचआरए मिळणार आहे.

 महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढल्याने पगारात किती होईल वाढ?

एखाद्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन समजा प्रत्येक महिन्याला 45 हजार 700 रुपये आहे व अगोदर जेव्हा 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता तेव्हा तो एकवीस हजार 22 रुपये होता.

परंतु आता त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता 50% झाला आहे व तो आता 22850 होईल. म्हणजेच 45 हजार 700 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला 1818 जास्त पगार मिळणार आहे.

 महागाई भत्ता 50% झाल्यामुळे घरभाडे भत्त्यात देखील झाली वाढ

केंद्र सरकारी कर्मचारी कुठे राहतात यावर त्यांना मिळणारा घर भाडेभत्ता अवलंबून असतो. जर आपण सातव्या वेतन आयोगाची शिफारस पाहिली तर त्यानुसार जेव्हा महागाई भत्ता 25 टक्क्यांवर पोहोचतो

तेव्हा X,Y, Z शहरांमधील घर भाडे भत्ता मूळ वेतनाच्या अनुक्रमे 27%, 18% आणि नऊ टक्क्यांपर्यंत सुधारित केला गेला आहे आणि आता महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर सरकारने त्यात पुन्हा सुधारणा केली आहे.

 त्यामुळे आता घर भाडेभत्ता म्हणजेच एचआरए किती वाढणार?

एखाद्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 45 हजार 700 रुपये असेल आणि तो वाय श्रेणीच्या शहरांमध्ये राहत असेल तर त्याला आतापर्यंत त्याचा घर भाडे भत्ता 8226 रुपये होता.

परंतु आता महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचल्यावर त्यांचा एचआरए म्हणजेच घर भाडेभत्ता 20 टक्क्यांपर्यंत वाढेल. म्हणजे त्यानुसार आता घर भाडेभत्ता हा नऊ हजार एकशे चाळीस रुपये करण्यात येणार आहे. म्हणजेच आता प्रत्येक महिन्याला अगोदर पेक्षा 914 जास्त मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe