7th Pay Commission: आगामी निवडणुकांपूर्वी मोदी सरकार मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवणार आहे. याबाबत निर्णय सरकार भविष्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेणार आहे. मात्र हे जाणून घ्या आतापर्यंत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
डीएमध्ये किती वाढ होऊ शकते?
अहवालाच्या आधारे बोलायचे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 3 टक्क्यांवरून 4 टक्के वाढ होऊ शकते. ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू केली जाऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के डीए दिला जात आहे. डीएमध्ये 3 टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून 45 टक्के डीए मिळेल आणि दुसरीकडे 4 टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना 46 टक्के डीए मिळेल.


शेवटची वाढ कधी झाली?
या वर्षी मार्चमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी डीए आणि डीआर 38 वरून 42 टक्क्यांवर 4 टक्क्यांनी वाढवले होते. ही दरवाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू झाली आहे. हे जाणून घ्या कि DA वाढीचा लाभ 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 70 लाख पेन्शनधारकांना दिला जातो. डीए केंद्रीय कर्मचार्यांना, तर DR पेन्शनधारकांना दिला जातो.

फिटमेंट फॅक्टर वाढेल का?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरला जातो. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. याचा अर्थ मूळ वेतन किमान वेतनाच्या 2.57 पट असेल. हे 3.68 असल्याचे सांगितले जात आहे, परंतु यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
हे पण वाचा :- IMD Rain Alert : नागरिकांनो सतर्क रहा! ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा, जाणून घ्या IMD अलर्ट