Airtel Recharge Plans : धमाकेदार ऑफर ! तुम्हालाही मिळणार अनलिमिटेड 5G डेटा, असा घ्या फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Airtel Recharge Plans : देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपनी एअरटेल आपले सतत वेगवेगळे आणि शानदार पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. असाच एक धमाकेदार रिचार्ज प्लॅन कंपनीने ऑफर केला आहे. कंपनीचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे.

या प्लॅनमध्ये आता तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा वापरता येणार आहे. जर तुम्हाला या प्लानचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तरच तुम्हाला या ऑफरचं लाभ मिळेल. दरम्यान काय आहे हा कंपनीचा प्लॅन? जाणून घ्या.

पहा प्लॅन

कंपनीचा 155 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:

हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS आणि एकूण 1GB डेटा ऑफर करतो. तुम्हाला या प्लॅनसोबत मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा प्रवेश यांचा समवेश आहे. पूर्वी कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज 99 रुपयांचा होता, परंतु काही काळापूर्वी कंपनीने हा प्लॅन अनेक सर्कलमधून काढून टाकला होता आणि त्याची किंमत 56 रुपयांनी वाढवली होती, त्यानंतर त्याची किंमत 155 रुपये झाली आहे.

कंपनीचा 179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:

हा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत असून यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 300 SMS आणि एकूण 2GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनसोबत मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा प्रवेश यांचा समावेश आहे.

कंपनीचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:

हा रिचार्ज प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येत असून यात एसटीडी आणि रोमिंग नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएससह एकूण 3GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनसोबत मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा प्रवेश यांचा समावेश आहे.

कंपनीचा 209 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:

आता हा प्लॅन काही वापरकर्त्यांसाठी थोडा महाग असू शकतो. पण जर तुम्हाला दैनंदिन डेटा फायद्यांसह प्लॅन हवा असेल असेल तर या योजनेचा विचार केला जाऊ शकतो. यामध्ये 21 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Hello Tunes आणि Wynk वर प्रवेश मिळतो.

असा मिळणार अनलिमिटेड 5G डेटा

समजा एखाद्या वापरकर्त्याला Airtel 5G Plus वापरायचा असल्यास तर त्यांच्याकडे 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे. वापरकर्ता एअरटेल वेबसाइट आणि एअरटेल थँक्स अॅपद्वारे रिचार्ज खरेदी करू शकतो किंवा इतर उपलब्ध अधिकृत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट ऑपरेटरद्वारे रिचार्ज करू शकतो.