7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कामगार मंत्रालयAICPI निर्देशांकाचे आकडे 31 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.
सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्क्याने महागाई भत्ता मिळत आहे. जर यात 4 टक्के वाढ झाली तर ती कर्मचाऱ्यांना 46 टक्क्याने महागाई भत्ता मिळू शकतो. असे झाले तर त्यांच्या पगारात वाढ होईल. याचा फायदा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना होईल.

या सहामाहीतील आतापर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे यावेळी देखीलही महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अजूनही AICPI निर्देशांकाचे जूनचे आकडे आले नाहीत. दरम्यान आतापर्यंत जाहीर झालेल्या AICPI निर्देशांकात तो जानेवारीमध्ये 132.8, फेब्रुवारीमध्ये 132.7, मार्चमध्ये 133.3, एप्रिलमध्ये 134.2 तसेच मेमध्ये 134.2 असा होता.अशा परिस्थितीत यावेळी देखील महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होऊ शकते अशी आशा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आहे. परंतु, कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढणार, हे सरकारकडून अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
खरं तर, कामगार मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या AICPI डेटाच्या आधारावर, केंद्र सरकार प्रत्येक 6 महिन्यांनी आपल्या कर्मचार्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीचा आढावा घेऊन त्यात वाढ करत असते. या आधारे पहिली दरवाढ जानेवारी महिन्यात आणि दुसरी दरवाढ जुलै महिन्यात केली जाते. साधारणत: जानेवारीचा महागाई भत्ता होळीच्या आसपास आणि जुलैसाठी दिवाळीपूर्वी रक्षाबंधनापूर्वी जाहीर करण्यात येतो.
AICPI निर्देशांकाच्या मागील 5 महिन्यांच्या आकडेवारीच्या आधारे, यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या 42 वरून 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येईल.
महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ झाली तर एकूण 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून या वर्षी होळीपूर्वीच महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ते 38 वरून 42 टक्के झाले. अशा परिस्थितीत या वेळीही डीए आणि डीआरमध्ये 4 टक्के वाढ झाली तर ती वाढून 46 टक्के इतकी होऊ शकते.