Tata Nano EV : बाजारात गेल्या काही वर्षांपूर्वी सामान्य लोकांसाठी टाटा मोटर्सकडून त्यांची सर्वात स्वस्त कार सादर करण्यात आली होती. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र काही कारणास्तव टाटा मोटर्सने नॅनो कारचे उत्पादन बंद केले आहे.
सध्या ऑटो क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ग्राहकांची इलेक्ट्रिक कारची मागणी पाहता अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कार उत्पादनावर भर दिला आहे. तसेच सध्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार ग्राहकांना उपलब्ध देखील करून दिल्या आहेत.
टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये चांगली मजबूत पकड निर्माण केली आहे. टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अनके इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. तसेच त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी असल्याने ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आता टाटा मोर्सकची नॅनो कार पुन्हा एकदा ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आत नॅनो ही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच टाटा मोटर्सकडून त्यांची नॅनो इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाणार आहे. टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार स्पोर्टी लूकमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार स्पोर्टी लुक
टाटा मोटर्सकडून त्यांची आगामी इलेक्ट्रिक कार नॅनोमध्ये स्पोर्टी लूक दिला जाऊ शकतो. या कारचे डिझाईन आकर्षक दिले जाऊ जाणार आहे. टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारमध्ये मोठ्या आकाराच्या अलॉय व्हील्स दिल्या जाऊ शकतात. तसेच कारमध्ये जास्त ग्राउंड क्लिअरन्स देखील जाऊ शकतो.
टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये
नॅनो इलेक्ट्रिक कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी, 6-स्पीकर साउंड सिस्टम, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, EBD सह अँटी ब्रेकिंग लॉकिंग सिस्टीम, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग, AC, फ्रंट पॉवर विंडो, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि रिमोट लॉकिंग अशी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.
बॅटरी पॅक आणि रेंज
टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी नॅनो इलेक्ट्रिक कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाणार आहे. या कारमध्ये कंपनीकडून पहिला 19 kWh ची लिथियम आयन बॅटरी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ही कार सिंगल चार्जमध्ये 250 किमीची रेंज देऊ शकते. तसेच कारमध्ये दुसरा 24 kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकते. यामध्ये ही कार 315 किमीची रेंज देण्यास सक्षम असेल.
टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची अपेक्षित किंमत
टाटा मोटर्सकडून नॅनो इलेक्ट्रिक कारबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. तसेच लॉन्चिंगबद्दल देखील काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची अपेक्षित एक्स शोरूम किंमत 5 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.