Infinix GT10 Pro : लवकरच लाँच होणार ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Pragati
Published:
Infinix GT10 Pro

Infinix GT10 Pro : Infinix ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन आणला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. कंपनी आपला Infinix GT10 Pro हा स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे.

यात तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. परंतु हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 3 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण 3 ऑगस्टपासून हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या Infinix GT10 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix ने आपला नवीन स्मार्टफोन तरुणांना लक्ष्य करून तयार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या आगामी फोनमध्ये सुपरफास्ट स्पीडसाठी MediaTek Dimensity 1300 SoC प्रोसेसर दिला आहे, जो Android 13 वर आधारित बूट XOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशन उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय Infinix GT10 Pro मध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz असणार आहे.

जर आपण कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनच्या मागील बाजूस 108-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर कॅमेरा असणार आहे, त्यासोबत कंपनीने दोन 8MP सेंसर कॅमेरे देखील देण्यात येते. यात उत्तम व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी, समोर 32MP सेन्सर असणार कॅमेरा देण्यात येईल. स्मार्ट फोनला 5000mAh ची बॅटरी मिळेल जी जास्त काळ टिकण्यास मदत होईल. GT10 Pro अतिरिक्त सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.

मिळतील हे फायदे

कंपनीने असे म्हटले आहे की नवीन स्मार्टफोन 3 ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. किमतीचा विचार केला तर भारतात या फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. तसेच या सोबतच फोन प्री-बुक करणार्‍या पहिल्या 5000 वापरकर्त्यांना एक खास प्रो गेमिंग किट उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांनाही स्मार्टफोन खरेदीवर अतिरिक्त फायदे देण्यात येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe