7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थकबाकी, महागाई भत्ता वाढ व होणारी पगारवाढ बद्दल अपडेट! वाचा तपशील

Ajay Patil
Published:
7th pay commission

7th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात अनेक प्रकारच्या सध्या चर्चा सुरू असून कित्येक दिवसापासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत प्रतीक्षा आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे व त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर तो 46 टक्के होईल. परंतु चार टक्क्यांची वाढ नव्हता तीन टक्क्यांची वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे  42 वरून 45 टक्के महागाई भत्ता वाढ होईल अशी सध्या स्थिती आहे.

महागाई भत्ता वाढीसोबतच जे काही पेन्शन धारक आहेत त्यांच्या देखील महागाई सवलती मध्ये अर्थात डी आर मध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्ता वाढीचा विचार केला तर सरकारकडून प्रत्येक महिन्याला औद्योगिक कामगारांकरिता जो काही ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर केला जातो त्या आधारे ठरवला जातो.

 कधीपर्यंत होऊ शकते महागाई भत्तावाढ?

साधारणपणे दसऱ्यापर्यंत महागाई भत्ता वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी जर आपण विचार केला तर 24 ऑक्टोबरला दसरा हा सण येत असून  महागाई भत्यातील नवीन दरवाढ ही एक जुलै 2023 पासून लागू होणार असल्यामुळे जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या महागाई भत्ता हा देय राहणार आहे.

म्हणजेच केंद्र सरकारची जर या अगोदरची पद्धत पाहिली तर ऑक्टोबरच्या वाढीव वेतनासोबत हा थकित महागाई भत्ता केंद्र सरकार भरणार अशी शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महागाई भत्त्याची गणना ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाचा एक भाग म्हणून केली जाते. म्हणून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की कर्मचाऱ्यांची पगार देखील वाढते.

 महागाई भत्ता वाढीचा कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीवर कसा परिणाम होतो?

पण उदाहरणावरून समजून घेतले तर समजा कर्मचाऱ्याला जर प्रत्येक महिन्याला 36 हजार पाचशे रुपये मूळ वेतन म्हणजेच बेसिक सॅलरी मिळते तर या मिळणाऱ्या बेसिक सॅलरी वरील 42 टक्के डीएनुसार तो 15330 रुपये आहे. जुलै 2023 पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता रकमेत १०९५ रुपयांची वाढ होईल व त्यामुळे एकूण महागाई भत्त्याची रक्कम सोळा हजार 425 रुपये होईल. एवढेच नाही तर महागाई भत्ता हा एक जुलै 2023 पासून लागू  होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या देयकावर तीन महिन्यांची थकबाकी देखील मिळेल अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe