Important Notice : बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा इशारा; 31 ऑक्टोबरनंतर डेबिट कार्ड होणार बंद…

Sonali Shelar
Published:
Important Notice

Important Notice : तुम्ही बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने एक महत्वाची सूचना जरी केली आहे. यामुळे ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो. तुम्हीही बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड वापरत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. कारण 31 ऑक्टोबरनंतर BOIचे डेबिट कार्ड निरुपयोगी होईल.

अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कार्डवरून कोणताही व्यवहार करता येणार नाही किंवा एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत. ही समस्या टाळण्यासाठी सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे?

31 ऑक्टोबरपर्यंत तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करा

बँक ऑफ इंडियाने (BOI) ट्विट करून ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, BOI च्या आदरणीय ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. प्रिय ग्राहक, ‘नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डेबिट कार्ड सेवांचा लाभ घेण्यासाठी वैध मोबाइल क्रमांक अनिवार्य आहे. डेबिट कार्ड सेवा बंद होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही कृपया तुमच्या शाखेला भेट द्या आणि 31.10.2023 पूर्वी तुमचा मोबाइल नंबर अपडेट किंवा नोंदणी करा.

जर तुम्ही BOI चे ग्राहक असाल आणि बँकेचे डेबिट कार्ड वापरत असाल, तर कोणताही विलंब न करता शाखेत जा आणि तुमचा मोबाईल नंबर नोंदवा किंवा अपडेट करा. अन्यथा तुम्ही तुमचे डेबिट कार्ड वापरू शकणार नाही.

बँकेच्या शाखेत जाऊन नंबर अपडेट करा

जर तुम्ही बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक ऑनलाइन किंवा एटीएमद्वारे बदलू शकत नसाल, तर तुम्ही थेट शाखेत जाऊन हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन मोबाईल नंबर बदलण्यासाठी चेंज फॉर्म भरावा लागेल. त्यात विचारलेली माहिती भरा. यासोबतच पासबुक आणि आधार कार्डची फोटो प्रतही सादर केली जाणार आहे. फॉर्म भरल्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe