स्मार्टफोन,घरगुती उपकरणे स्वस्तात घेण्याची सुवर्णसंधी! कधी सुरू होत आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल?

सणासुदीचा कालावधी असो किंवा काही विशेष प्रसंग या सगळ्या कालावधीमध्ये प्रसिद्ध असलेले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून सेल जाहीर केले जातात व या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक प्रकारची गॅझेट, घरगुती उपकरणे स्वस्तात मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते.

Ajay Patil
Published:
amazon sale

Republic Day Sale:- सणासुदीचा कालावधी असो किंवा काही विशेष प्रसंग या सगळ्या कालावधीमध्ये प्रसिद्ध असलेले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून सेल जाहीर केले जातात व या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक प्रकारची गॅझेट, घरगुती उपकरणे स्वस्तात मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते.

जसे आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये फेस्टिव सीजन सेल बघितले व या सेलचा देखील अनेक ग्राहकांनी फायदा घेतला असेलच. अगदी त्याचप्रमाणे आगामी येऊ घातलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या दोन्ही प्रसिद्ध असलेल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजेच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून रिपब्लिक डे सेलची घोषणा करण्यात आलेली आहे.

त्यामुळे परत एकदा ग्राहकांना अनेक आवश्यक असलेली गॅझेट आणि स्मार्टफोन सारखी उपकरणे स्वस्तात मिळू शकणार आहेत.

कधी सुरू होत आहे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचा रिपब्लिकन डे सेल?
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध असलेले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून रिपब्लिक डे सेलची घोषणा करण्यात आलेली आहे.

यामध्ये ॲमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल 13 जानेवारी रोजी नॉन प्राईम वापरकर्त्यांसाठी सुरू होणार आहे तर प्राईम युजर्स करिता बारा तासांअगोदर सुरू झालेला आहे.

इतकेच नाही तर फ्लिपकार्ट चा मोनुमेंटल सेल 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे व प्लस सदस्यांना एक दिवस आधी म्हणजेच आज 13 जानेवारी रोजी या सेलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

ॲमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल मधील ऑफर
ॲमेझॉनच्या या सेलमध्ये वन प्लस, सॅमसंग तसेच एप्पल, iQOO, शाओमी सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन तसेच या स्मार्टफोन संबंधित आवश्यक ॲक्सेसरी यांच्यावर 40% पर्यंत सूट मिळणार आहे. तसेच नवीनच लॉन्च करण्यात आलेले वन प्लस तेरा, वन प्लस तेरा आर, आयफोन 15, सॅमसंग गॅलेक्सी M 35 यासारखे स्मार्टफोन कमी केलेल्या किमतीत मिळणार आहेत.

इतकेच नाहीतर ऑनर 200 आणि गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा व रियलमी नार्जो N61 इत्यादी स्मार्टफोन सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत.

स्मार्टफोन शिवाय घरगुती उपकरणे तसेच टीव्ही व प्रोजेक्टर वर देखील 65 टक्के सूट मिळणार आहे. इयरफोन, स्मार्टवॉच व माऊस यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती 199 रुपयापासून सुरू होतील.

फ्लिपकार्ट मोन्यूमेंटल सेलमधील ऑफर्स
फ्लिपकार्टच्या या सेलमधून आयफोन 16 ज्याची किंमत 74 हजार 900 रुपये आहे. तो स्मार्टफोन या सेलमध्ये 63 हजार 999 रुपयांना मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 24 प्लस 56 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे तर एप्पल आयपॅड (1th Gen)27 हजार 999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध असणार आहे.

जर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वापरले व खरेदी केली तर पाच टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तसेच ब्रँडेड कंपन्यांचे स्मार्टफोन तसेच लॅपटॉप, टीव्ही व टॅबलेट व इतर घरगुती उपकरणांवर देखील सवलत दिली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe