Post Office TD Scheme:- प्रत्येक गुंतवणूकदार त्याच्या कष्टाच्या पैशांची जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा तो कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार नसतो. त्यामुळे जोखीम न घेता गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस आणि बँकांमधील अनेक गुंतवणूक योजनांना गुंतवणूकदारांकडून प्राधान्य दिले जाते.
त्यामुळे तुम्हाला देखील जर कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही फायद्याची ठरू शकते व ती सर्वात सुरक्षित देखील मानली जाते.
यामागील प्रमुख कारण म्हणजे पोस्ट ऑफिसच्या ज्या काही योजना आहेत त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवल्या जातात व त्यामुळे गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही व उत्तम असा परतावा देखील मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आहेत व त्यासोबत एफडी योजना देखील आहे. यामध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल व कुठल्याही प्रकारचा धोका तुम्हाला नको असेल व चांगला परतावा देखील हवा असेल तर या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिस टीडी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत व तिलाच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम असे देखील म्हणतात.
पोस्ट ऑफिस टीडी अर्थात पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही आजच्या काळामध्ये एक विशेष योजना मानली जाते. कारण या योजनेमध्ये जर गुंतवणूक केली तर जास्त परतावा मिळतो. या योजनेमध्ये तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता व तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही या योजनेत गुंतवू शकतात.
म्हणजे जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्ही यामध्ये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला खाते उघडायचे असेल तर तुम्ही एकल म्हणजेच तुम्ही वैयक्तिक खाते देखील उघडू शकतात किंवा तुमच्या पत्नीसोबत जॉईंट अकाउंट देखील उघडू शकतात व त्या खात्यात गुंतवणूक सुरू करू शकतात. ही स्कीम एक हमी आणि विश्वासाची योजना म्हणून ओळखली जाते.
या योजनेत किती गुंतवणूक केल्यावर मिळतात सात लाख 24 हजार 974 रुपये
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमचा कालावधी पाच वर्षे आहे व यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे पाच वर्षासाठी गुंतवावे लागतील. सध्या या योजनेमध्ये 7.5% व्याजाचा लाभ दिला जात आहे
व यानुसार जर तुम्ही या योजनेत पाच वर्षासाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.5 टक्के या व्याजदराने दोन लाख 24 हजार 974 रुपये व्याजाचा फायदा मिळतो.
जेव्हा पाच वर्षे पूर्ण होतात म्हणजेच ही योजना जेव्हा मॅच्युअर होते तेव्हा तुम्हाला तुमची गुंतवलेली मुद्दल पाच लाख आणि त्यावर मिळणारे दोन लाख 24 हजार 974 रुपये मिळून पाच वर्षात सात लाख 24 हजार 974 रुपयाचा परतावा मिळतो.
या योजनेच्या गुंतवणुकीवर मिळतात हे फायदे
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करणे अनेक अर्थाने फायदेशीर असे आहे. तुम्ही जर या योजनेत गुंतवणूक केली तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो.
तसेच या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजावर देखील कुठलाही कर आकारला जात नाही. त्यामुळे कर बचती सोबतच सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना एक चांगला पर्याय आहे.